नवनीत राणा सुनावणीला गैरहजर; मुंबई पोलिसांचा आरोप

    05-Aug-2022
Total Views |
navneet
 
 
 
 
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार महाराष्ट्रात आल्यापासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा न्यायालयीन कामकाजात गैरहजर असल्याचे मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. मुंबई पोलिसांनी या दाम्पत्याला देशद्रोहाच्या गुन्ह्यात दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.
 
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीचा हवाला देत आंदोलन मागे घेतले होते. महाराष्ट्रातील खासदार आणि आमदारांशी संबंधित कायदेशीर खटल्यांचे निवारण  करणाऱ्या मुंबई विशेष न्यायालयाने शुक्रवारी या दाम्पत्याला न्यायालयीन कामकाजात अनुपस्थित राहिल्याबद्दल फटकारले.
 
 
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, नवीन सरकार आल्यापासून हे दाम्पत्य किंवा त्यांचे वकील न्यायालयात येत नाहीत आणि कायदेशीर प्रक्रिया हलक्यात घेत आहेत. दुसरीकडे, वकील शब्बीर शोरा यांनी राणा यांच्या वतीने कोर्टात धाव घेतली आणि कामकाजात हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितली. या प्रकरणाची सुनावणी ११ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.