बाहेर पाऊस आहे आंदोलन कसं करू? चिदंबरम यांच्यापुढे यक्षप्रश्न!

05 Aug 2022 15:38:43
PC
 
 
नवी दिल्ली: महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एआयसीसीच्या मुख्यालयात जमले होते. तर, सर्व खासदारांनी काळे कपडे घालून संसदेत प्रवेश केला. राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.दिल्लीत सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यसभा खासदार पी. चिदंबरम यांना आंदोलन कसं करू? असा प्रश्न पडला आहे.
 
संसदेच्या आवारात असताना पी. चिदंबरम यांचा खासदार राजीव शुक्ला यांच्याशी चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये राज्यसभा खासदार पी. चिदंबरम यांना आंदोलन कसं करू? असा प्रश्न पडला आहे.
काँग्रेसच्या आंदोलनापूर्वी दिल्लीच्या काही भागात जमाव बंदीचे प्रतिबंधात्मक आदेश प्रशासनाने लागू केले होते. निर्बंधांचा हवाला देत, दिल्ली पोलिसांनी निषेध करण्यासाठी काँग्रेसला परवानगी नाकारली होती. राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा आणि इतर काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते पक्षाच्या मुख्यालयाबाहेर इतर काँग्रेस नेत्यांसोबत निदर्शने करत होते. त्यांना दिल्लीतील किंग्सवे कॅम्प येथील पोलीस लाईन्समध्ये ठेवण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0