मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मल्लिकार्जुन खर्गे यांची सात तास ईडी चौकशी

    05-Aug-2022
Total Views |
Mallikarjun
नवी दिल्ली: नॅशनल-हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांची गुरवारी दि. ४ ऑगस्ट रोजी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली. नवी दिल्लीतील नॅशनल हेराल्ड इमारतीत असलेल्या यंग इंडियन ऑफिसला ईडीने सील केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दि. ४ ऑगस्ट खर्गे यांना समन्स बजावण्यात आले होते. त्याला कर्मचारी, पगार आणि यंग इंडियनच्या व्यावसायिक क्रियाकलापांबद्दल विचारले जात आहे.
 
 
हे प्रकरण नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालकी असलेल्या काँग्रेस-प्रचारित यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी ईडीने यंग इंडियन लिमिटेडचे वित्त आणि कामकाजाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यंग इंडियनमधील प्रमुख भागीदार आहेत. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) द्वारे प्रकाशित केले जाते आणि त्याची होल्डिंग कंपनी यंग इंडियन आहे. आणि नॅशनल-हेराल्ड हे वृत्तपत्र कार्यालय एजेएलच्या नावाने नोंदणीकृत आहे. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची जुलैमध्ये आणि त्यांचे खासदार पुत्र राहुल गांधी यांची जूनमध्ये चौकशी केली होती.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.