पुण्यात ई - वाहनांना पसंती! ई - वाहनांच्या खरेदीत चारपटीने वाढ

    04-Aug-2022
Total Views |

electric
 
पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीसाठी ‘इलेक्ट्रिक’ वाहनांचा वापर वाढला आहे. नागरिकांचा ई-बाईककडे ओढा वाढला असून केवळ पुण्यात २०२२ या वर्षांत ‘इलेक्ट्रिक’वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात ‘इलेक्ट्रिक’वाहनांच्या खरेदीमध्ये चार ते सहापटीने वाढ झाली आहे. मे २०२२ पर्यंत पुणे ‘आरटीओ’ कार्यालयात ८ हजार, २२० वाहनांची नोंदणी झाली आहे. याआधी पुण्यात २०२० मध्ये केवळ १ हजार, ४५० तर २०२१ मध्ये यात ४.२८ टक्के वाढ होऊन, ६ हजार, २१९ ‘इलेक्ट्रिक’वाहनांची नोंदणी झाली होती.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीसाठी ‘इलेक्ट्रिक’वाहनांसह सौरऊर्जेकडेदेखील नागरिकांचा कल वाढला आहे. शिवाय हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडूनदेखील उपाययोजना सुरू आहेत. यामुळे पुण्यातील हवा सुधारत असल्याचे चित्र आहे.
‘पीएमपी’ ताफ्यात ३१० ‘इलेक्ट्रिक’ बस
‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात २ हजार, २५५ बस आहेत. यामध्ये ७४ टक्के म्हणजे १ हजार, ६५८ ‘सीएनजी’ बस आहेत. तसेच, ३१० ‘इलेक्ट्रिक’बस आहेत. या बसची संख्या ६५० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.
हवेची गुणवत्ता थोडी सुधारली
 
शहरात २०२१ मध्ये ‘सूक्ष्म धूलिकण’ या वर्गात एकही दिवस नोंदविला गेला नाही. वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी १६३ दिवस हवा चांगली होती, तर अतिसूक्ष्मकण या श्रेणीत २०२१ या वर्षी दोन दिवस हे ‘पुअर’ या श्रेणीत नोंदविले गेले आहेत.

सौरऊर्जेचा वाढता वापर
 
पुण्यातील नागरिक पर्यावरणाबाबत अधिक संवेदनशील होत असून सौरऊर्जा वापरास प्राधान्य देत आहेत. नागरिकांनी सौरऊर्जेपासून १६.२० कोटी युनिट वीजनिर्मिती केली आहे. नागरिक सौरऊर्जा युनिट बसवून त्याचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.