संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स!

04 Aug 2022 16:39:52

raut
 
मुंबई: पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. तर, ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ४ ऑगस्ट रोजी समन्स बजावण्यात आले आहेत.
 
 
पत्राचाळ प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहेत. वर्षा राऊत यांच्या खात्यावरून पैशांची देवाणघेवाण करण्यात आल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. तर, ते पैसे संजय राऊत यांच्यासाठी असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.
 
वर्षा राऊत यांच्या खात्यावरून झालेल्या व्यवहाराबाबत संजय राऊत माहिती देत नाहीत, एका व्यक्तीला आम्ही चौकशीला बोलावले आहे, ज्या व्यक्तीचे नाव आम्ही इथे घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीला आणि राऊतांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. असे ईडीकडून कोर्टात सांगण्यात आले होते.
 
हे पैसे कुठून येत होते? वर्षा राऊत यांना याबद्दलची माहिती होती का? अकाउंट कोण ऑपरेट करत होत? फक्त वर्षा यांच्या नावे खाते उघडून संजय राऊतच ते खाते ऑपरेट करत होते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ईडीला वर्षा राऊत यांच्याकडून जाणून घ्यायची आहेत. त्यामुळेच ईडीकडून वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आले आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0