युवराज कोकणात इलो आणि पावसात भिजून गेलो!

    04-Aug-2022
Total Views |
y
 
 
 
 
नुकताच शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने कोकण पालथा घातला आणि एक प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे शिवसेनेने कोकणाला काय दिले? कोकणी माणसाने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आणि म्हणूनच कोकणाला शिवसेनेचा गड मानला जातो पण त्याबदल्यात शिवसेनेने कोकणाला दिले खड्डे पडलेले रस्ते, लोडशेडिंग, बेरोजगारी. 
 
 
 
पाहिला मुद्दा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न शिवसेनेने का मार्गी लावला नाही? -
 
शिवसेनेतील उठावाने खळबळून जाग आलेल्या आदित्य ठाकरेंना अखेर कोकण दौऱ्याचा मुहूर्त सापडला. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याकडे शिवसैनिकाने पाठफिरवली, त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंची फजिती होऊ नये म्हणून भगवा हाती घेतला अशा सर्वत्र चर्चा आहेत. कोकण दौरा करणाऱ्या ठाकरेंना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे देशातील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील मोठ मोठ्या रस्तेप्रकल्प पूर्ण होतात मग आमचा मुंबई गोवा महामार्ग इतकी वर्ष उलटूनही अजून का रखडला?
 
 
 
दुसरा मुद्दा कोणे एकेकाळी कोकणच्या कोस्टल रोडचा प्रकल्प देखील चर्चेत होता पण पुढे तो प्रकल्प का रखडला? -
  
मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करण्याच्या अनुषंघाने, मुंबई कोकण ईवेचा प्रस्ताव दिला गेला होता. ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेसवे असे त्याचे नामकरण देखील करण्यात आले होते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातून ४०० किलो मीटरचा हा नवा मार्ग बनणार होता. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा बराचसा ताण हलका होणार असे सागितले जात होते. या मार्गाची फक्त घोषणा केली गेली प्रत्यक्षात त्याचे पुढे काहीच झाले नाही. काहीही झालं कि केंद्र सरकारकडे बोट दाखवणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्या कार्यकाळात ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेस वे चा साधा डीपीआर तयार करता आला नाही. मग प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले?
 
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्या ठाकरेंनी कोकणातील सागरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी काय केले? -
कोकणी माणसाने आपल्या मतांचे दान शिवसेनेच्या पारड्यात टाकताना कधीही आखडता हात घेतला नाही. तसेच शिवसेनेने आपल्या राजकारणाच्या केंद्रास्थानी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेऊन लोकांची मते मिळवली पण याच शिवसेनेने कोकणातील सागरी किल्ल्यांसाठी काय केले? आज महाराष्ट्रासह कोकणात किल्यांची दुरवस्था झालेली आहे.
 
 
 
 
कुठे तटबंदी कोसळलीये तर कुठे सागरी लाटांच्या माऱ्याने बुरुज ढासळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग व आरमाराचे महत्त्व खूप आधीच ओळखून कोकणात अनेक दुर्ग बनवले. मात्र, वर्षानुवर्षे लाटांचे तडाखे खाल्ल्यानंतरही दिमाखात उभे राहिलेले हे जलदुर्ग सरकारी अनास्थेमुळे आता ढासळत चालले आहेत. यासाठी आपल्या कार्यकाळात शिवसेनेने काय केले? छत्रपतींच्या नावाने भावनेचे राजकारण करणाऱ्या ठाकरेंनी महाराजांच्या गड किल्यांच्या संवर्धनासाठी काय केले?
 
 
 
निसर्गचक्रीवादळां नंतर शिवसेनेने कोकणासाठी काय केले -
 
महाविकास आघाडीच्या काळात निसर्गचक्री वादळाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले कोरोनाच्या जीवघेण्या परिस्थितीतून कसेबसे सावरत असतानाच कोकणावर चक्रीवादळाने आघात केला. अशा बाक्याप्रसंगी ठाकरे सरकारकडे मोठ्या आशेने पाहत असलेल्या कोकणी माणसाला तुटपुंजी मदत करून उद्धव ठाकरेंनी कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडले. ठाकरेंनी तर मुख्यमंत्री या नात्याने साधा पाहणी दौरा देखील केला नाही. एकतर निसर्गचक्री वादळात ठाकरे सरकार कडून मिळालेली मदत ही खूपच कमी होती आणि अजूनही ती अनेकांना मिळाली नसल्याचा ठाकरे सरकारवर आरोप केला जातोय.
 
 
  
नाणार असो वा जैतापूर शिवसेनेने कोकणचा विकास करणाऱ्या प्रकल्पांचा कायमच विरोध केला. -
 
'नाणारमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प निर्माण होणार होता. या प्रकल्पामुळे कोकणच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटणार होता. स्थानिक देखील आपल्या जमीनी या प्रकल्पाला देण्यासाठी तयार झालेले पण ऐन वेळी शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध दर्शवून विकास विरोधी राजकारण करायला सुरुवात केली. पुढे महाविकास आघाडीत संसार थाटल्यावर मात्र नाणारप्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नसेल तर आम्ही स्थानिकांसोबत आहोत असे वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी आपल्याच भूमिकेला छेद दिला. मग प्रश्न उपस्थीत होतो तो नाणार प्रकल्प हा कोकणच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे याची जाणीव असून देखील शिवसेना अशी लबाडी का करते?
 
 
 
 
आता जैतापूर अणुउर्जाप्रकल्पाचच उदाहरण घ्या शिवसेनेने या प्रकल्पात देखील विरोधाचा खोडा घातला. एक तर लोडशेडींगची तलवार कायम महाराष्ट्राच्या मानगुटीवर टांगलेली आहे. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पांने महाराष्ट्राच्या लोकशेडिंगचा प्रश्न कायमचा निकाली लागेल. पण विरोध किंवा बंद हा ज्यांचा छंद आहे त्या शिवसेनेला कोण समजावणार. बर विरोध दर्शवून शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी विजेचा प्रश्न कसा सोडवणार किंवा कोकणातील तरुणांना नोकऱ्या कशा उपलब्द करून देणार याचे कोणतेही प्लानिंग केलेले नाही. मग नाणार किंवा जैतापूरला विरोध करून शिवसेनेने कोकणी माणसाचे वाट्टोळ असे म्हंटल्यास वावगे वाटायला नको.
 
 
शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कोकणच्या विकासासाठी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरेंनी नेमके काय केले? -
  
देशासह परदेशातील अनेक पर्यटकांचे कोकण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. कोकणाला महाराष्ट्राचे वैभव देखील म्हंटले जाते. नारळ पोफळीच्या बागा, समुद्र किनारा, अंबा,काजू,करवंद,फणस हा कोकणीमेवा अनेकांना आपल्याकडे खेचून आणतो पण हवामानबदलामुळे कोकणातील आंबा उत्पादन संकटात सापडले आहे. आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून द्या अशी मागणी अनेकदा आंबा आणि काजू उत्पादकांकडून करण्यात येते पण त्याचे पुढे काहीच होत नाही.
 
 
 
आता जरा मुद्द्यकडे येऊयात या सगळ्यासाठी आदित्यजी तुमच्या सरकारने काय केले? पर्यटन आणी पर्यावरण मंत्री म्हणून तुम्ही कोकणासाठी काय केलेत कोणते प्रकल्प राबवलेत? तरुणाच्या रोजगारा संबंधी तुम्ही कोणता निर्णय घेतला होता? कोकणात एक पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार होते. बी शँक प्रकल्प राबवण्यात येणार होता. अंडर वॉटर वर्ड अशा स्वरूपाचा एक अभिनव प्रकल्प होणार होता ते सगळ आपण का अमलात आणले नाहीत? याची उत्तरे आदित्य ठाकरे कधी देणार?
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.