एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून १०० कोटींचा निधी मंजुर

    04-Aug-2022
Total Views |
 
ST Bus 
 
 
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला मोठा ब्रेक लागला. कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी आणि एसटी महामंडळाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाने १०० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाल्यापासुन प्रत्येक कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली होती. त्यामुळे तात्काळीन सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. संपकाळात जिल्ह्यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला होता. संपकऱ्यांनी तात्काळीन सरकारच्या काही मागण्या मान्य करत संप मागे घेतला. या मागण्यांमध्ये पगारवाढीची मागणी काही प्रमाणात मान्य करण्यात आली होती. या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
 
 
 
 
 
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील वेतनासाठी शासनाने १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. यामध्ये फडणवीस-शिंदे सरकारचे आभार व्यक्त करत, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मविआच्या काळात झालेली १०० कोटींची चर्चा आणि फडणवीस-शिंदे सरकारमध्ये होत असलेली १०० कोटींची चर्चा, किती फरक आहे पाहा. एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले आहेत. शिवसेना भाजपा सरकारचे धन्यवाद, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.