कोलकत्ता: कोळसा तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. दि. २ सप्टेंबर रोजी ईडीच्या कोलकाता कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी, 'टीएमसी'चे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी या वर्षी मार्चमध्ये ईडीसमोर हजर झाले होते.
ईडीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात नाव असलेल्या दोन कंपन्या - लीप्स अँड बाउंड प्रायव्हेट लिमिटेड आणि लीप्स अँड बाउंड मॅनेजमेंट सर्व्हिसेस एलएलपी - अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या कुटुंबाशी जोडल्या गेल्या आहेत. कथित कोळसा तस्करी प्रकरणातील आरोपींमार्फत कंपन्यांना एका बांधकाम कंपनीकडून ४.३७ कोटी रुपयांचा संरक्षण निधी मिळाल्याचा आरोप आहे. अभिषेक बॅनर्जी यांचे वडील अमित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा हे लीप्स अँड बाउंड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांपैकी आहेत. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक स्तरावरील सिंडिकेट समस्या टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवसाय मालकांकडून दोन कंपन्या कथितपणे निधी मिळवत होत्या. या प्रकरणी अधिक चौकशी साठी अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावण्यात आले आहे.