'संगीत देवबाभळी' बघून दिलीप जोशीही झाले थक्क!

    03-Aug-2022
Total Views | 78

dilip joshi
 
 
 
मुंबई : 'संगीत देवबाभळी' या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर नवे विक्रम रचले आहेत. या नाटकाने तर अनेक नाट्य स्पर्धांमध्ये तर बाजी मारलीच आहे, नुकताच या नाटकाला काही दिवसांपूर्वी 'साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे. एव्हढेच नाही तर हे नाटक आता मुंबई विद्यापीठाच्या 'बीए' अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आले आहे. विजया मेहता, स्व. जयंत पवार, डॅा. राजीव नाईक, सतीश आळेकर, नसिरुद्दीन शाह, परेश रावल, दिलीप प्रभावळकर अशा अनेक दिग्गजांनी या नाटकाला गौरवले आहे. आता हिंदी आणि गुजराती मधील दिग्गज नट अभिनेते दिलीप जोशी म्हणजेच 'तारक मेहता उलटा चश्मा' मालिकेतील सर्वांचे लाडके जेठालाल यांनाही 'संगीत देवबाभळी'ला हजेरी लावली. यावेळी ते देखील हे नाटक पाहून ते अक्षरशः भारावून गेले.
 
 
 
'तारक मेहता उलटा चश्मा' गेली १४ वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आली आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्याला आपल्या घरातला वाटू लागला आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'जेठालाल' हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी हिंदी आणि गुजराती भाषेत अनेक भूमिका केल्या आहेत. ते स्वतः एक रंगकर्मी असून गुजराती रंगभूमीवर त्यांचे मोठे योगदान आहे. 'संगीत देवबाभळी'ची सर्वत्र चर्चा असल्याने दिलीप जोशी यांनाही संगीत देवबाभळी पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या एका प्रयोगाला ते उपस्थित होत. 'संगीत देवबाभळी' पाहून ते थक्क झाले.
 
 
 
दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे, 'या नाटकाविषयी गेली बरेच दिवस ऐकून होतो त्यामुळे ते पाहण्याची इच्छा होती. हे नाटक पाहून मी निःशब्द झालो आहे, अवाक झालो आहे. हा एक उत्तम रंगमंचीय अविष्कार आहे, म्हणजे लाईट, साउंड, दिग्दर्शन, सेट सगळ्याच बाबतीत. नाटक सुरु झाल्यापासून ते आपल्याला भावविवश करते. एकदा पाहून पोट भरणार नाही. प्राजक्त, मानसी, शुभांगी सगळ्यांनीच कमाल आहेत. रखुमाई आणि अवलीला ज्या पद्धतीने लोकांसमोर आणले आहे ते प्रत्येकाने बघायला हवे.'
 
 
 
संत तुकोबांना भंडाऱ्याच्या डोंगरावर भाकरी द्यायला गेलेली, काटा रूतून बेशुद्ध झालेली अवली आणि तिला लखुबाई बनून घरी घेऊन येणारी साक्षात रखुमाई यांच्यातील संवादातून अलौकिक नात्याची वीण प्राजक्त देशमुख यांनी संगीत देवबाभळीमध्ये रेखटली आहे. देवत्व लाभलेल्या रखुमाईला अवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. या नाटकात अभिनेत्री मानसी जोशी हिने रखुमाईची तर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने आवलीची भूमिका साकारली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशमध्ये सूफीइस्लामशी निगडित पवित्र स्थळांवर इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ले सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. हे हल्ले इतके भीषण आहेत की १०० पेक्षा जास्त मजार व दर्गे लक्ष्य बनले शेख हसीना यांच्या सरकारचा पडाव झाल्यानंतर या घटना आणखीन वाढल्या. मोहम्मद यांच्या अंतरिम सरकारने अद्याप त्यावर ठोस पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यांमुळे केवळ धार्मिक स्थळांचे नुकसान होत नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का बसत आहे. शतकानुशतकेबांग्ला संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली सूफी परंपरा आता धोक्यात..

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

"देशातील प्रत्येकजण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या समाजासाठी आणि विकासप्रक्रियेकरीता आपला वाटा उचलत आहे. हेच आपल्या देशात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. शुक्रवार,दि.१९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ऑर्गनाईसद्वारे आयोजित आणि एनएसईच्या सहकार्याने 'अर्थायम- धार्मिक मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शन'च्या ६० व्या वर्षाचे स्मरण करत विचारप्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121