नवी दिल्ली: 'आझादी का अमृत महोत्सव'चा भाग म्हणून, केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी दि. ५ ते १५ ऑगस्ट पर्यंत देशभरातील सर्व पुरातत्व सर्वेक्षण संरक्षित स्मारके/स्थळांना मोफत प्रवेश देण्याची घोषणा केली आहे .
पुरातत्व सर्वेक्षण द्वारे भारतभर ३,५००हून अधिक स्मारके संरक्षित आहेत.
"'आझादी का अमृत महोत्सव' आणि ७५व्या स्वंतंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी ५ ते १५ ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरातील सर्व संरक्षित स्मारके/स्थळांना अभ्यागत/पर्यटकांसाठी मोफत प्रवेश दिला आहे," केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी दि. १२ मार्च २०२१ रोजी साबरमती आश्रम, अहमदाबाद येथून ‘पदयात्रा’ (स्वातंत्र्य मार्च) सुरू आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ च्या पडदा उठवणाऱ्या उपक्रमांचे उद्घाटन केले. १५ ऑगस्ट २०२२च्या ७५ आठवड्यांपूर्वी सुरू झालेला 'आझादी का अमृत महोत्सव' १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहील, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. त्यांनी महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या महान व्यक्तींनाही आदरांजली वाहिली.
आझादी का अमृत महोत्सव ही भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची मालिका आहे. जन-भागीदारीच्या भावनेतून हा महोत्सव जन-उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. सांस्कृतिक मंत्रालय आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम पाहत आहे.