तीस्ता सेटलवाडने राजकीय आणि आर्थिक लाभांसाठी गुन्हेगारी कृत्य केले

29 Aug 2022 18:07:04
 
teesta
 
 
नवी दिल्ली : तीस्ता सेटलवा हिने राजकीय, आर्थिक आणि अन्य लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्या साथीदारांसह गुन्हेगारी कृत्य केले आहे. त्याचप्रमाणे एका राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर गुजरात दंगलप्रकरणी खोटे पुरावे सादर करण्याचे कृत्यदेखील तपासाअंती सिद्ध झाले आहे, असे सांगून गुजरात सरकारने कथित सामाजिक कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड हिच्या जामीन अर्जा,स विरोध केला आहेय. याप्रकरणी आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे.
 
 
गुजरात दंगलप्रकरणी गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी कथित सामाजिक कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड सध्या गुजरात पोलिसांच्या कोठडीत आहे. अटकेविरोधात तीस्ता हिने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असून त्यापूर्वी सोमवारी गुजरात सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये तीस्ता हिच्या जामीनास विरोध करण्यात आला आहे.
 
 
प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलप्रकरणी खोटे पुरावे सादर करण्याप्रकरणी तीस्ता सेटलवाडविरोधात दाखल एफआयआर केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारिक नसून त्यासाठी भक्कम पुरावेदेखील आहेत.
 
 
आतापर्यंतच्या चौकशीमध्ये सेटलवाडविरोधात २००२ सालच्या दंगलीशी संबंधित खोटे पुरावे सादर करणे आणि योग्य पुराव्यांना खोटे सुद्ध करण्यासाठी केलेल्या कारवाया स्पष्ट झाल्या आहेत. याचिकाकर्त्याने अन्य आरोपींसोबत कटकारस्थानास मूर्त रूप देऊन राजकीय, आर्थिक आणि अन्य लाभांसाठी गुन्हेगारी कृत्य केल्याचे दिसून आल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
 
 
सेटलवाड यांनी राजकीय पक्षांकडून आर्थिक लाभ प्राप्त केल्याचे प्रतिज्ञापत्रास सांगण्यात आले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांनुसार सेटलवाड हिने एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या इशाऱ्यावरून कट रचला. त्याचप्रमाणे सेटलवाडने त्या राजकीय नेत्यासोबत बैठका करून मोठ्या प्रमाणावर पैसा प्राप्त केला होता. त्याचप्रमाणे सेटलवाडसोबत अन्यही आरोपी यासाठीच कार्यरत असल्याचेही प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0