मला गोमांस खायला आवडतं : रणबीर कपूर

29 Aug 2022 12:46:46
ranbir  
 
 
 
मुंबई :  नुकताच आमीर खानचा लालसिंह चढ्डा हा सिनेमा बॉयकॉट ट्रेंडमुळे डब्यात गेला. ते प्रकरण ताजं असतानाच बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याने गोमांस खाण्या बद्दल केलेल्या वक्तव्याने त्याच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नेटकरी करत आहेत. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच ब्रम्हास्त्र सिनेमाच्या अडचणी वाढल्या आहेत.
 
 
२०११ साली रणबीर कपूरचा रॉकस्टार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना एका व्हिडीओमध्ये आपल्याला गोमांस खायला खूप आवडते, असे रणबीरने सांगितले होते. सध्या तो व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. "आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देत नाही, 'ब्रम्हास्त्र' सिनेमाला बॉयकॉट करा", अशी मागणी काही युजर्स शोशल मिडीयावर आपल्या कॅमेंटच्या माध्यमातून करत आहेत.
 
 
 
 
 
 
 
जुलै २०२२ मध्ये रणबीरचा 'समशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. त्यामुळे समशेरा प्रमाणेच 'ब्रम्हास्त्र' सुद्धा फ्लोप होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या काही काळापासून आपल्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने बॉलीवूडमध्ये चिंतेच वातावरण आहे. परंतु असे असले तरी दक्षिणात्य सिनेमांना मात्र प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभतोय. त्यामुळे बॉलीवूडने सध्या आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे एकंदरीत परिस्थितीवरून म्हणावे लागेल.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0