आर्टेमिस-१ लाइव्ह: नासाच्या चंद्र मोहिमेचे लाँच

29 Aug 2022 12:28:45
नासा
 
 
नवी दिल्ली: नासा आपले आजपर्यंतचे सर्वात शक्तिशाली आर्टेमिस-१ हे स्पेस रॉकेट आज अंतराळात पाठवणार आहे. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही चाचणी आहे. सध्या या रॉकेटमध्ये कोणी अंतराळवीर नसले, त्या ऐवजी पुतळे पाठवले जाणार आहेत. तब्बल 50 वर्षांनंतर नासा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे.
 
या मोहिमेसाठी नासाच्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण वाहन 'स्पेस लॉन्च सिस्टम' चा वापर करण्यात आला आहे. ही मोहीम 'ओरियन क्रू कॅप्सूल' यांची कार्यक्षमता प्रदर्शित करेल. अंदाजे सहा आठवडे चालणार्‍या मोहिमेदरम्यान ही रॉकेटस सुमारे ६५ हजार किलोमीटरचे अंतर प्रवास करतील. या मोहिमेचा 'ब्लास्टॉफ' फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून दि. २९ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:03 वाजता प्रक्षेपित होईल. ही एक मानव विरहित मोहीम असून यामध्ये मानवी चालका जागी 'मॅनेक्विन्स'चा वापर केला जाणार आहे. या यानात, सेन्सर-सुसज्ज मॅनेक्विन्स कंपन, प्रवेग आणि रेडिएशनचे अंश मोजतील. आणि ही आकडेवारी नासाच्या पुढच्या मोहिमांसाठी वापरली जाईल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0