'त्या' फोटोशूट बद्दल रणवीर सिंगची पोलीस चौकशी

29 Aug 2022 18:28:19
 
ranveer
 
 
मुंबई : रणवीर सिंगने एका मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. जबर वादग्रस्त ठरलेल्या त्या फोटोशूटमुळे त्याला समाजमाध्यमांवर जबरदस्त टीकेचा सामना करावा लागला होता. याच प्रकरणी त्याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले होते. अखेर रणवीर सिंगने सोमवारी सकाळी चेंबूर येथील पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी आपले निवेदन सादर केले. तब्बल अडीच तास चाललेल्या त्याच्या चौकशीत त्याला जवळपास १० प्रश्न विचारले गेले आणि त्यावर त्याचा जबाब नोंदवला गेला. आपण या संपूर्ण प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा रणवीरने आपल्या निवेदनात केला आहे.
 
 
तपास यंत्रणांना आपण सर्वतोपरी सहकार्य करू असा विश्वास रणवीरने दिला आहे. २२ जुलै रोजी अमेरिकास्थित एका मॅगझीनसाठी रणवीरने न्यूड फोटोशूट केले होते. समाजमाध्यमांवर त्याचे ते फोटो व्हायरल झाल्यावर रणवीरला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. त्याच्याविरोधात एका एनजीओने मुंबईत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी वेळ मागितला होता. या प्रकरणात दोषी आढळ्यास रणवीर भारतीय दंडविधानुसार ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0