मुंबई: आधी शिवसेनेचे आमदार, मग खासदार आणि त्यापाठोपाठ नगरसेवकही सोबत घेऊन जाणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता, शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावाही काबीज करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी मागितलेली आहे. परंतु, पालिकेकडून यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
यासंबंधी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, "मेळाव्याची परवानगी मिळण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. ओरिजनल शिवसेना कुणाची हे तुम्हाला माहित आहे. जनता आमच्या सोबत आहे आणि सोबत राहणार. शिवसेनेने कुठेही भुमिका सोडली नाही. शिवसेनेची भुमिका कायम आहे." असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.