बॉयकोटच्या यादीत आता माईलस्टोन 'शोले'चा समावेश

27 Aug 2022 16:40:42

sholey
 
 
 
 
मुंबई : बॉलीवूड कलाकारांसाठी सध्याची परिस्थिती बरीचशी प्रतिकूल झाली आहे. एकीकडे प्रेक्षक थिएटरकडे पाठ फिरवतायत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर अनेक सिनेमांना बॉयकॉट केले जात आहे. आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा', अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' आणि विजय देवरकोंडाच्या 'लाइगर' सिनेमा विरोधात सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेन्ड वादग्रस्त ठरला. तिन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलेच आपटले आहेत. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे बॉयकोटच्या यादीमध्ये आता आयकॉनिक 'शोले' सिनेमा देखील समाविष्ट झाला आहे.
 
 
 
सोशल मीडियावर 'शोले' विषयी अपमानास्पद भाष्य केलं जात आहे आणि बोललं जात आहे की, ७० व्या दशकापासून बॉलीवूड हिंदूफोबिक म्हणजे हिदूंच्या विरोधात लोकांच्या मनात भीती आणि राग भरवण्याचा प्रयत्न करत आहे.आतापर्यंत फक्त नव्या बॉलीवूड सिनेमांवर आरोप केले जात होते; परंतु आता सत्तरच्या दशकातही बॉलीवूड सिनेमांनी हिंदू धर्माची प्रतिमा डागाळली होती आणि मुस्लिम धर्मीय व्यक्तिरेखांना चांगलं दाखवलं गेलं होतं. याचे उदाहरण म्हणजे 'शोले' आणि 'सुहाग'. हे दोनीही चित्रपट त्या काळातील सुपरहिट सिनेमे होते.
 
 
 
लोक या दोन्ही चित्रपटांची ट्वीटरवर उदाहरणं देताना म्हणतायत की, 'शोले' मध्ये गावातील रहीम चाचा भला माणूस दाखवलाय. तर 'सुहाग' सिनेमात अमजद खान आणि अन्य कलाकारांना साधुंच्या वेशात दाखवलं गेलं आहे, ज्यांच्या व्यक्तीरेखा सिनेमात खलनायकाच्या आहेत. म्हणजेच सिनेमाच्या माध्यमातून साधूंचा देखील अपमान करण्यात आला होता.
 
 
 
 
त्यामुळे आता या बॉयकॉट ट्रेन्डमध्ये कोणकोणत्या सिनेमांचा समावेश होणार आहे, याची धाकधूक काही कलाकारांच्या मनात आहे. कारण जो सिनेमा रिलीज होत आहे तो बॉयकोटची शिकार होत आहे. रिलीज आधीच सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी केली जाताना दिसतेय. यामध्ये आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र'चा देखील सोशल मीडियावर समावेश झालेला दिसून येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0