काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. : पृथ्वीराज चव्हाण

26 Aug 2022 19:16:30
 
chavan
 
 
 
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी दि. 26 ऑगस्टला पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. याआधी गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्ष पद मिळाल्यानंतर काही तासातच प्रकृतीचे कारण सांगुन राजीनामा दिला. यामुळे राजकिय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला. यानंतर आता कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कॉंग्रेसचे महत्त्वाचे नेतेच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
 
 
 
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी केलेल्या आंदोलनात गुलाम नबी आझाद सहभाही होते. शिवाय त्यांवेळी पत्रकार परिषदेलाही संबोधित केलं होतं. गुलाम नबी आझाद बराच काळ काँग्रेसवर नाराज होते. काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या G-23 गटातही त्यांचा सहभाग होता. G-23 गट सातत्याने काँग्रेसमध्ये अनेक बदलांची मागणी करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने आझाद यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवावी, अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. पण अध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच आझाद यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांची नाराजी समोर आली होती.
 
 
 
आझाद यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वात जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. काँग्रेसचा सेक्युलर चेहरा सोडून गेला आहे. सद्या हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु असताना सुप्रीम कोर्टाकडून कोणत्याही अपेक्षा शिल्लक नाहीत. काँग्रेस मजबूत असणे गरजेचे आहे. काँग्रेसला प्रभावी विरोधी म्हणुन पुढे येणे गरजेचं आहे असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. यामुळे चव्हाणांच्या या प्रतिक्रियेमुळे काँग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे. तसेच "सोनिया गांधी यांना राजीनामा देताना मी 2015 मध्ये जे पत्र लिहिले होते तसेच्या तसे पत्र आज गुलाम नबी आझाद यांनी लिहिले आहे." अशी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी प्रतिक्रिया दिली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0