अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले!

26 Aug 2022 16:58:06

ad



मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यावर त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. मात्र, अटकेत असल्यापासून त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा त्रास सुरु होता.
 
 
26 ऑगस्ट रोजी, जेलमध्ये असताना अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागले. त्याच दरम्यान ते चक्कर येऊन पडले. छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
 
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. यानंतर जेलमधील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. अनिल देशमुख यांना आणखी काही दिवस जेजे रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0