'ये भारत का तिरंगा है! कभी झुकेगा नही!'

23 Aug 2022 15:36:02

allu
 
 
 
 
नवी दिल्ली : 'पुष्पा्' फेम अल्लू् अर्जुन हा सध्या भारतातील सगळ्यात मोठ्या सुपरस्टार्सच्या यादीत जाऊन बसला आहे. शिवाय 'पुष्पा' चित्रपटामुळे त्याचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर थेट सातासमुद्रापार पसरला आहे. नुकताच, अल्लू अर्जुन अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये भारताचा तिरंगा फडकावताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
 
 
भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र साजरा झाला. यामध्ये अमेरिका देखील सहभागी होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या भारताच्या ७५वा स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये 'पुष्पा' म्हणजेच अल्लू अर्जुन याला सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. यावेळीस अल्लू अर्जुन सहभागी तर झालाच पण शिवाय त्याने भारताचा तिरंगा फडकावून तेथे राहणाऱ्या संपूर्ण भारतीयांचे मन जिंकले.
 
 
 
 
 
 
 
 
 
तर याचबरोबर सर्व चाहत्यांना आणि भारतीय नागरिकांना ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या. या वेळी शुभेच्छा देताना त्याने आपल्या 'पुष्पा: द राइज' चित्रपटातील भन्नाट आणि लोकप्रिय डायलॉग म्हटला पण तो देखील एकदम वेगळ्यापद्धतीने. 'ये भारत का तिरंगा है! कभी झुकेगा नही!' असे म्हणत त्याने सर्वांचे मन जिंकले. यावेळी या परेडमध्ये अल्लू अर्जुनबरोबर त्याची पत्नी स्नेहा रेड्डी देखील उपस्थित होती.
 
 
 
अल्लू अर्जुन भारतीय दाक्षिणात्य अभिनेता जरी असला तरी त्याची ख्याती ही दूरवर पसरलेली आहे. त्याच्या 'पुष्पाी: द राइज' ने बॉक्स' ऑफिसवर ३०० कोटी कमावले होते.
Powered By Sangraha 9.0