लाऊडस्पीकरवर अजान हे मुस्लीमेतरांच्या अधिकारांचं उल्लंघन नाही : न्यायालय

23 Aug 2022 14:29:02

KARNATAKA HC

बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने सोमवारी मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्यावरुन बंदी आणण्यासंदर्भात नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार, अजान दिल्यामुळे अन्य धर्मीयांच्या कुठल्याही मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही. उच्च न्यायालयाने मशिदींवर भोंगे हटवण्याच्या किंवा लाऊडस्पीकरवर अजान न देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.


दरम्यान, न्यायालयाचने अधिकाऱ्यांना लाउडस्पीकर संदर्भात ‘ध्वनि प्रदूषण नियम’ लागू करण्यास तसेच या संदर्भातील अहवाल सोपविण्याची विनंती केली आहे. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने बंगळुरूतील स्थानिक मंजूनाथ एस. हलावर यांच्या एका जनहीत याचिकेवर सुनावणी देताना याबद्दल म्हटले की, "अजाण ही मुस्लीमांची एक आवश्यक धार्मिक प्रथा आहे. दरम्यान, अजानचा आवाज हा अन्य धर्म मानणाऱ्यांना त्रासदायक असू शकतो."


न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, ‘भारतीय संविधान का अनुच्छेद २५ और २६ सहिष्णुता के सिद्धांताचे प्रतीक आहे. हेच भारतीय सभ्यतेचे वैशिष्ट्य आहे. संविधानातील अनुच्छेद २५ (१) अनुसार प्रत्येकाला आपापला धर्म मानण्याचा मुलभूत अधिकार आहे. मात्र, हा अधिकारच केवळ पूर्ण नाही. त्याशिवाय सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता, आरोग्याशी संदर्भात प्रकरणे या सगळ्यात भारतीय संविधानाच्या भाग ३ अंतर्गत येणाऱ्या प्रतिबंधांना अनुसरुन असायला हवा." न्यायालयाने म्हटले की, अजानचा आवाज याचिकाकर्ते आणि अन्य धर्मातील कुठल्याही व्यक्तीच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करते, असे म्हटले जाऊ शकत नाही.




Powered By Sangraha 9.0