मोहित कंबोज करतायतं 'बारामती एग्रो लिमिटेड'चा अभ्यास!

22 Aug 2022 16:21:43
 
mk
 
 
मुंबई- भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत सूचक ट्वीट करत निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशीची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचं सुचक ट्वीट केल होतं.
 
 
आता, कंबोज यांनी पवार कुटुंबातील आणखी एका सदस्यावर निशाणा केला आहे. आधी सिंचन घोटाळा आणि आता रोहित पवार यांच्या ॲग्रो आणि सहकारी कारखान्यांचा उल्लेख त्यांच्या ट्वीटमध्ये आहे. मोहित कंबोज आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीसंदर्भात मी सध्या अभ्यास करत आहे. त्यासंदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येईन", असा इशाराच कंबोज यांनी दिला आहे.
 
 
रोहित पवार यांच्या ॲग्रीकल्चर आणि साखर कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्याचे कंबोज यांनी ट्विटमधून स्पष्ट केलंय. "बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या यशाचं रहस्य काय, ज्याचा अभ्या करुन मी तरुणांसमोर मांडेन, ज्याचा त्यांना भरपूर फायदा होईल", असे म्हणत कंबोज यांनी रोहित पवार यांना निशाणा केला आहे.
 
नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?
 
"मोहित कंबोज यांना मी आतापर्यंत कधी भेटलो नाही, असं सांगतानाच वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव ऐकलंय. पण प्रसिद्धी माध्यमांमध्ये येण्यासाठी ते फारच धडपड करत असतात, ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा आणि त्याचसोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे, तुम्ही त्याच कंबोजांबद्दल मला प्रश्न विचारलाय ना..." असे म्हणतं रोहित पवारांनी मोहित कंबोज यांची खिल्ली उडवली होती.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0