शरीरप्रकृती आणि रोगप्रवणस्थिती

22 Aug 2022 21:23:15
 
rgn
 
 
 
रोगप्रवणस्थितीचा अभ्यास करताना आपल्याला असे लक्षात येते की, माणसाची शरीरप्रकृती आणि शारीरिक ठेवण ही जगात राहण्यासाठी खास प्रकारे तयार केलेली असते, तर रोगप्रवणस्थिती म्हणजे माणसाची विशेष आजारी पडण्याची पद्धत.
 
 
Constitution is the characteristic way to live in the world. While diathesis is the characteristic way of a person of getting sick.
 
 
शरीरप्रकृती म्हणजे शरीरयष्टी, खास गुणधर्म, आवडीनिवडी आणि शारीरिक प्रतिक्रिया, त्याचबरोबर भावनिक आणि बौद्धिक प्रतिक्रिया होय, तर रोगप्रवणस्थिती (डायथेसिस) म्हणजे एखाद्या ठरावीक आजाराबद्दलची एखाद्या माणसाची ठरावीक संवेदनशीलता.
 
 
आपण ‘ट्युबरक्युलर डायथेसिस’ म्हणजेच क्षयरोगकारक रोगप्रवणस्थितीचा अभ्यास करत आहोत. क्षयरोगकारक रोगप्रवणस्थिती बरोचदा क्षयरोग झाल्यानंतर दिसून येते. क्षयरोगाची लक्षणे येऊन गेल्यावर व औषधोपचाराने क्षयरोग पूर्ण बरा झाल्यावरही क्षयरोगसदृश लक्षणे व चिन्हे काही रुग्णांमध्ये दिसून येतात. या रुग्णांच्या सर्व तपासण्या करूनही त्यातून क्षयरोगाचे निदान हेत नाही. अशा वेळी असे लक्षात येते की, त्या माणसाची शरीराची संवेदनशीलता ही क्षयरोगसदृश रोगप्रवणस्थितीसाठी अनुकूल झालेली आहे. काही केसेसमध्ये असे लक्षात येत असते की, आईवडिलांना किंवा आजी-आजोबांना जर क्षयरोगाची लागण झालेली असेल, तर त्यांच्यानंतरच्या पिढ्यांमध्ये क्षयरोगसदृश्य लक्षणे दिसून येतात व ‘ट्युबरक्युलर डायथेसिस’ तयार होत असतो.
 
 
अशा रुग्णांमध्ये बरेचदा छातीचा संसर्ग, फुप्फुसांचे आजार, दम लागणे, थकवा व अशक्तपणा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. अशा रोगप्रवणस्थितीमध्ये रुग्णाचे वजन घटते. रुग्ण सडपातळ होतो. प्रचंड थकवा जाणवतो. धाप लागते. श्वसनांचे विकार होण्याची प्रवृत्ती वाढीला लागते. लहान मुलांना सतत सर्दी-खोकला व त्यानंतर ताप अशी लक्षणे दिसून येतात. प्रतिजैविक (अ‍ॅण्टिबायोटिक्स)वगैरे देऊन अशी लक्षणे तात्पुरती दबली जातात. रुग्णांना मुख्यत्वे लहान मुलांना सतत काही त्रास होत राहतो व ही प्रकृती लवकर जर बरी नाही केली, तर या मुलांना पुढे जाऊन दमा होऊ शकतो. यासाठी 100 टक्के खात्रीचा उपाय म्हणजे होमियोपॅथी.
 
 
या शारीरिक स्थितीचा परिणाम मनावरही होत असतो. या क्षयरोगप्रवृत्त रोगप्रवणस्थितीची माणसे फार चंचल असतात पटकन चिडतात. एका जागी स्थिर राहत नाहीत. सतत त्यांना नवीन गोष्टी हव्या असतात. सतत त्यांना बदल हवा असतो. हे रुग्ण फार रागीट असतात व जरी शरीराने बारीक असले, तरी त्यांच्यात खूप ऊर्जा असते व थकेपर्यंत ते ऊर्जा सतत वापरत राहतात. त्याचबरोबर हे रुग्ण खूप मित्रसुद्धा असतात.अशा सर्व लक्षणांचा अभ्यास होमियोपॅथीमध्ये केला जातो व त्यानुसार ‘डायथेसिस’ निवडून त्याचे औषध दिले जाते. त्यामुळे रोगप्रवणस्थिती निघून जाते व सतत होणारे आजार आपल्याला टाळता येतात.
 
 
कित्येकदा तर या ‘कॉन्स्टिट्यूश्नल’ व ‘डायथेसिस’ च्या आधारे होमियोपॅथिक उपचार केले असता आपण पुढे होणारे गंभीर व अतिगंभीर आजारही टाळू शकतो व रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतो. ‘ट्युबरक्युलर डायथेसिस’ ची बरीच लक्षणे आहेत. इथे मोजकीच लक्षणे देऊन समजवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे आपण अजून काही प्रकारच्या रोगप्रवणस्थितीबद्दल माहिती घेणार आहोत.
 
 
 - डॉ. मंदार पाटकर
Powered By Sangraha 9.0