ममतांच्या राज्यातील काळे धंदे लवकरच बंद होणार!

21 Aug 2022 16:09:41

 
mamata
 
 
 
 
नवी दिल्ली : नोटबंदी नंतर लगेचच, बेहिशेबी पैसे गुंतवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये शेल कंपन्यांचे पेव फुटले होते. राज्यात झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यासारख्या अनेक घोटाळ्यांमधून मिळालेला सर्व काळा पैसा गुंतवण्यासाठी या कंपन्या उघण्यात आल्या होत्या. लवकरच या सर्व कंपन्यांचे दिवस भरणार आहेत कारण केंद्रीय आयकर विभाग या सर्व कंपन्यांवर कारवाई कारवाईच्या तयारीत आहे. लवकरच ही कारवाई सुरु होईल. या सर्व कंपन्या सत्ताधारी तृणमूलचे घोटाळेबाज मंत्री पार्थ चॅटर्जी आणि दुसरे मोठे नेते अनुब्रत मंडल यांच्याशी संबंधित आहेत.
 
 
आयकर विभागाकडे असलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१६ पर्यंत बंगालमधील सूचिबद्ध कंपन्यांची संख्या १,१८, ५३५ इतकी होती, पण ३१ मार्च २०१७ला हाच आकडा १,२८, १०२ झाला. अवघ्या एकच वर्षात तब्बल १० हजार कंपन्यांची भर पडली होती. या सगळ्या कंपन्यांमध्ये नोव्हेंबर नंतर प्रचंड वाढ झाली होती. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पुढच्या चारच वर्षात तब्बल ५ हजार कंपन्यांना टाळे लागले. हीच या प्रकरणातील सर्वात मोठी संशयास्पद गोष्ट आहे.
 
 
नोटबंदी नंतर देशातील काळे धंदे करणाऱ्यांचे कंबरडेच मोडल्याने काळा पैसे गुंतवण्यासाठी हा शेल कंपन्यांचा मार्ग अनेक घोटाळेबाजांनी अनुसरला होता.पश्चिम बंगालमध्ये या सर्व गोष्टींमध्ये राजकारणी लागेबांधे सुद्धा होते. ईडीकडून या सर्व घोटाळ्यांचा पर्दाफार्श व्हायला लागल्यानंतर यामधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा सहभाग उघड व्हायला लागला. सध्या तृणमूलचे पार्थ चॅटर्जी आणि अनुब्रत मंडल हे दोघेही ईडीच्या गजाआड आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0