दोघांच्याच सरकारने राज्याचे नुकसान! विरोधीपक्षनेते अजित पवार यांचा आरोप

02 Aug 2022 12:32:33
 
ncp
 
  
 
मुंबई : "राज्यात दोघांचेच असलेले सरकार राज्याला नुकसानकारकच आहे, राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असताना सरकार या पुरग्रस्तांच्या प्रश्नात काय काम करत आहे?" असा सवाल राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री सत्कार स्वीकारत आहेत हे संवेदनाहीनतेचे लक्षण आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.
  
राज्यात एक महिना उलटला तरी दोघांचेच सरकार राज्यात आहे. मंत्रिमंडळ विस्तार नेमका होणार कधी हे कळायला काहीच मार्ग दिसत नाही. उठाव केलेल्या सर्वच आमदारांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याने ही अडचण टायर झाली आहे का? असा प्रश्न पवारांनी विचारला आहे. १० लाखांहून अधिक शेतीक्षेत्र बाधित झाले असताना देखील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे सरकरने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत आणि फळबागांचे नुकसान झाले असेल तर हेक्टरी ३ लाखांची मदत त्वरित जाहीर करावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.
 
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत त्यामुळे मदतकार्यामध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत. या सर्वांवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा. विदर्भ आणि मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी विरोधीपक्षनेता या नात्याने अजित पवार मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0