कुर्ल्यातील कांदळवन क्षेत्रावर अनधिकृत भराव टाकणारे ताब्यात!

02 Aug 2022 19:46:08
Dumper
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): कुर्ल्यातील परीघखाडी जवळील नंदादीप गार्डन शेजारी राखीव कांदळवन वृक्षांवर, तसेच मिठी नदी लागत अनधिकृत भराव टाकत असलेल्या टोळीला रंगे हाथ पकडण्यात आले आहे. या मध्ये तीन डंपर आणि एक जेसीबी-सह चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पाहणी दरम्यान कांदळवन क्षेत्रावर भराव टाकल्यामुळे कांदळवन क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले आहे.
 
सोमवारी दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी माहीम धरावी जवळील परीघखाडी येथे एक टोळी कांदळवन क्षेत्रावर भराव टाकत असल्याचे समोर आले. वन विभागाच्या कांदळवन कक्षाने त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली, आणि आरोपींना रंगे हात पकडले. या मध्ये तीन डंपर आणि एक जेसीबी-सह चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1)(अ)(ड)(फ)(ह)व कलम 63 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. या कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम, वन परीक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, रामदास सोर, भगवान मोडवे वनपाल, कुष्णा पोले, रामदास राक्षे, संतोष गजभरे, ए. जे. रायबन वनरक्षक यांनी केली.
Powered By Sangraha 9.0