स्वप्निल सांगतोय अभिज्ञा भावेचे गुपित

02 Aug 2022 16:29:17

swapnil
 
 
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी. झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेमध्ये सप्निल सध्या मुख्य भूमिकेत दिसून या मालिकेत तो सौरभची भूमिका साकारत आहे. तो सेटवरील भन्नाट गोष्टी त्याच्या सोशल मिडीयावर शेअर करत असतो. अशातच त्यानं इन्स्टाग्रामवर, मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानं त्याची सहकलाकार अभिनेत्री अभिज्ञा भावेविषयी एक गुपित सांगितलं आहे.
 
 
 
 
या मजेशीर व्हिडिओमध्ये त्यानं अभिज्ञा भावे कशी शिंकते हे प्रेक्षकांना सांगितलं आहे. एवढंच नाही तर स्वप्निलनं तिची नक्कलसुद्धा करुन दाखवली आहे. अभिज्ञा शिंकताना 'येस' असा आवाज करते. त्यामुळे हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
 
 
 
मालिकेच्या सेटवरचे मजेदार किस्से, भन्नाट फोटो, व्हिडीओ स्वप्निल चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यामुळे स्वप्निलची पोस्ट बघायला त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे त्याने पोस्ट शेअर करताच चाहते स्वप्नीलच्या पोस्टना प्रचंड प्रतिसाद देतात. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठा आहे.
 
 
 
swapnil
 
 
 
'तू तेव्हा तशी' या मालिकेत सध्या स्वप्नील आणि शिल्पा तुळसकर यांची सुंदर केमिस्ट्री दिसून येत आहे. सोबतच या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि इतर दिग्गज कलाकारसुद्धा आहेत. हे कलाकार सतत सेटवर धम्माल मस्ती करताना दिसून येतात. शिवाय मालिकेच्या कथेमुळे आणि कलाकारांमुळे या मालिकेला पुष्कळ पसंती मिळाली आहे.
Powered By Sangraha 9.0