संजय राऊत जेलमध्ये गेल्याचा आनंद; बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने पेढे वाटले

02 Aug 2022 16:12:26
sanjay raut 
 
पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वाचाळ वक्तव्यामुळे शिवसेनेत फुट पडली. राऊत यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली असा आरोप अनेकदा झाले. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने संजय राऊतांना अटक केल्यानंतर प्रकाश राजपूत यांनी पेढे वाटले. पेढे वाटण्यासाठी ते धुळ्याहून दिल्लीला गेले. दिल्लीला खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत. संजय राऊत यांनी शिवसेना संपवली, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी पेढे वाटले.
 
कोण आहेत प्रकाश राजपूत?
प्रकाश राजपूत हे मुळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर या गावाचे आहे. १९९२ ते २००० या काळात बाळासाहेब ठाकरेंचे ड्रायवर असल्याचे ते सांगतात. दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. संजय राऊतांना ईडीकडून अटक झाल्यानंतर शिवसैनिक प्रकाश राजपूत यांनी पेढे वाटत आनंद व्यक्त केला. "संजय राऊत हे खूप चुकीच काम करताय, यांनीच शिवसेना संपवली" अशी प्रतिक्रिया यावेळी दिली.
 
संजय राऊत यांना रविवारी दि. ३१ जुलैला रात्री उशिरा पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली. या प्रकरणी संजय राऊत यांना ईडी कडून ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुन्यावण्यात आली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु असताना ईडीने आणखी दोन ठिकाणी छापे मारले आहेत. यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0