पुष्पाचा डबल फायर लुक

02 Aug 2022 17:42:47
 
 
pushpa
 
 
 
मुंबई : 'पुष्पा' सिनेमाच्या भरघोस यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन अधिकच चर्चेत आला आहे. कारण त्याच्या 'पुष्पा' चित्रपटानं संपूर्ण भारताला वेड लावलेलं पहायला मिळालं. परंतु आता अल्लू अर्जुन आता 'पुष्पा २' मुळे चर्चेचा विषय ठरत आहे. पुष्पाचे चाहते 'पुष्पा २' आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर 'पुष्पा २' ची चर्चा होताना दिसत आहे. अशातच अल्लू अर्जुनचा नवा जबरदस्त लुक समोर आला आहे. त्यामुळे हा फोटो 'पुष्पा २' च्या लुकचा असावा, असा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे. अल्लू अर्जुनच्या या लुकने सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
 
 
 
अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याचा नवा लुक शेअर केला आहे. आणि यामध्ये तो फायर नाही तर डबल फायर दिसत आहे. लेदर जॅकेट, हातात सिगार, गॉगल, स्टायलिश केस अशा वेशात अल्लू अर्जुनला पाहून चाहते खुश झाले आहेत. अल्लूचा हा पुष्पा २ मधील लुक असल्याचं चाहते सांगत आहेत. त्याच्या या डबल फायर लुकवर चाहत्यांच्या कमेंटचा आणि लाईक्सचा वर्षावर होत आहे.
 
 
View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

 
 
'स्टाईल है बॉस, किलर, ये मस्त था गुरु, सुपर अन्ना, ये पुष्पा २ का सीन है, स्वॅग, स्टायलीश स्टार, कडक', अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया चाहते त्याच्या या नव्या पोस्टवर देत आहेत. अल्लूचा हा नवा लुक काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे आता पुष्पा २ लवकरच प्रेक्षकांस भेटायला येणार का? ही चर्चा त्याच्या फॉलोअर्स मध्ये सुरु आहे.
 
 
 
 
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा'ने बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली. पुष्पा पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुनची बॉलिवूडमधील लोकप्रियता देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात त्याचे चाहते आहेत. त्यामुळे चाहते सध्या त्याच्या 'पुष्पा २'च्या प्रतिक्षेत आहेत.
Powered By Sangraha 9.0