...आणि दहीहंडीत झाला 'अफझल खानाचा वध!'

19 Aug 2022 19:31:56
 
dahihandi
 
 
 
 
मुंबई : उंचच उंच थरांच्या दहिहंड्यांची चर्चा होत असताना दादर मधील एका दहीहंडीच्या मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दहीहंडीचे थर लावताना त्यावर चक्क अफझल खान वधाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. दादरमधील आयडीयल लेन मधील एका दहीहंडीत सर्वात शेवटच्या थरावर अफझल खानाचा वधाचा देखावा सादर करण्यात आला. या अशा अनोख्या प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. छत्रपती शिवरायांच्या चरित्रातील या असामान्य घटनेच्या सादरीकरणाने सर्वांनाच चकित केले आहे.
 
 
दोन वर्षांच्या कोविड काळानंतर आता कुठे मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे, सर्व सण, उत्सव साजरे करायला मिळत आहेत. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव देखील खूप उत्साहात साजरा केला जातोय. मुंबईतही सर्वच राजकीय पक्षांनी मोठया धामधुमीत दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळे यंदा मुंबईतील गोविंदा पथकांचा उत्साहदेखील द्विगुणित झाला आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी खेळाला साहसी खेळांचा दर्जा देत, गोविंदांना अपघात विमा, सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडू कोट्यातून आरक्षण या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. या सर्व सुविधा देताना या सर्व सुविधा फक्त १८ वर्षांवरील गोविंदांनाच लागू असतील ही अटही टाकली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0