मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या अनेक जोड्यांची चर्चा सुरु आहे. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. 'शेरशहा' चित्रपटापासून यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे , बऱ्याच काळापासून ते दोघे रिलेशनशिपमध्येही आहेत. मात्र गेले काही दिवस त्यांनी ब्रेकअप केल्याच्या बातमीला उधाण आले होते. हे दोन्ही सेलिब्रेटी नुकतेच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. त्यात करणनं त्यांना थेट त्यांच्या रिलेशनशिपबद्दल विचारल्यानंतर दोघांनी जे उत्तर दिले त्यावरुन त्यांचे चाहते पुन्हा एकदा खुश झाले आहेत.
कॉफी विथ करण या शोमध्ये करण जोहर नेहमीच सर्व सेलिब्रिटीजची पोलखोल करत असतो, शिवाय प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न करण विचारतो म्हणून या शोचा प्रेक्षकवर्गही खूप मोठा आहे. यापूर्वी अक्षय-समंथा, आमिर-करिना, आलिया-रणबीर, सोनम आणि अर्जुन कपूर, विकी कौशल या सेलिब्रेटीजना त्यानं करणने बोलतं केलं होतं.
आता करणने सिद्धार्थ आणि कियाराला त्यांच्या रिलेशनशिपवरुन प्रश्न विचारला होता. यावरून त्या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. कियारा आणि सिद्धार्थने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि आता ते दोघे लग्नाचे प्लॅनिंगही करत आहेत असेही त्यांनी सांगितले. आधी, करणच्या या शोमध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ गेले होते. तेव्हा करणनं कियाराचा एक व्हिडिओ सिद्धार्थला दाखवत सिद्धार्थला प्रश्न विचारला होता. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, 'आम्ही लवकरच चाहत्यांना जे अपेक्षित उत्तर आहे ते देऊ, पण मी हे काही कॉफी विथ करणमध्ये सांगणार नाही.'
करण जोहर नेहमीच त्याच्या शोमधून रोखठोक प्रश्न विचारत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. त्यामुळे नेटकरी त्याचे कौतूकही करत असतात.