म्हणून फडणवीसांची निवडणूक समितीतील निवड महत्वाची ठरते!

17 Aug 2022 15:09:40
 
 
fadnavis
 
 
 
 
नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार निश्चितीच्या प्रक्रिया करणारी पक्षांतर्गत सर्वोच्च समिती असलेल्या भाजपच्या निवडणूक समितीच्या सदस्यपदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या एका सर्वोच्च केंद्रीय समितीवर देवेंद्र यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने जे. पी. नड्डा हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह हेही या समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. आसाम भाजपमधील महत्वाचे नाव आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, ओम माथूर, भूपेंद्र यादव यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
 
 
म्हणून फडणवीसांची निवडणूक समितीवर नियुक्ती महत्वाची
 
देशात होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची निश्चिती करण्याचे काम ही निवडणूक समिती करते, त्यामध्ये राज्य विधानसभा, लोकसभा, राज्यसभा अशा सर्वच निवडणुकांचा समावेश असतो. उमेदवारांच्या नावाची छाननी करून निवडणुकीसाठी अंतिम नावांची यादी जाहीर करणे, हे काम या समितीकडे असते इतके महत्वाचे काम या समितीकडे असते त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपमधील एक मोठे नाव या समितीत असणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. देवेंद्र फडणवीसांकडे निवडणूक जिंकण्याचे कसाब असल्याचे खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीसांचे कौतुक करताना म्हटले होते.
 
 
 
 
 
 
बिहार विधानसभा निवडणुकीत फडणवीस हे बिहार भाजपचे प्रभारी होते, त्यांच्या नेतृत्वात प्रथमच बिहारमध्ये भाजपला जदयुपेक्षा जास्त जागा जिंकता आल्या होत्या. तसेच २०२२ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरून सत्ता स्थापन करू शकला होता याचे संपूर्ण श्रेय हे फडणीवसांकडेच जाते. या सर्व गोष्टींमुळे या समितीत फडणवीसांचा समावेश महत्वाचा ठरतो.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0