युवराजांची निष्ठा दहीहंडी, उत्सव निष्ठेचा जल्लोष दहीहंडीचा!

17 Aug 2022 18:53:05
 
paus
 
 
 
मुंबई : आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपकडून दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला असताना त्याला उत्तर म्हणून आदित्य ठाकरेंनीही दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. १९ ऑगस्टला दादरच्या शिवसेना भवन समोरील राम गणेश गडकरी चौकात हा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेने या कार्यक्रमासाठी जोरदार पोस्टरबाजी सुरु केली आहे.
 
 
 
 
 
या दहीहंडी उत्सवाला आदित्य यांनी उत्सव निष्ठेचा असे नाव दिले आहे. त्यामुळे याही उत्सवातून आदित्य ठाकरे आपल्या निष्ठायात्रेचाच अजेंडा राबवणार असेच दिसत आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आदित्य शिवसेना शिवसैनिकांना पुन्हा भावनिक साद घालतील. याही उत्सवाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपला राजकीय अजेंडा पुढेच रेटू बघत आहे हेच दिसतेय.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0