सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीट नाहीच!

17 Aug 2022 17:44:34

ap
 
 
मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार आता अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच मोहित कम्बोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होणार असल्याची माहिती दिल्यानंतर आता मोठ्या घडामोडी घडत आहे. अजित पवारांना ज्या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लिनचीट देण्यात आली होती. ती अद्याप मान्य न केल्याची प्रार्थमिक माहिती हाती येत आहे.
 
कम्बोज यांनी ट्विट केल्यानंतर अजित पवारांच्या या प्रकरणाबद्दल माहिती उघडकीस आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तपास यंत्रणांनी दिलेल्या क्लिनचीटचा अहवाल अद्याप न्यायालयाने स्वीकारला नसल्याचे सांगितले जात आहे. दोन वर्षांपासून हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या प्रकरणाबद्दल चर्चा होत असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढवली आहे.
 
हे प्रकरण तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अखत्यारीत आल्यावर २०१९मध्ये तपास यंत्रणांनी अजित पवारांना क्लिनचीट दिली. याबद्दलचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये रखडलेल्या सुनावणीत या प्रतिज्ञापत्राचा स्वीकार अद्याप न्यायालयाने केलेला नाही,
अशी माहिती आहे.
 
माझा स्ट्राईक रेट शंभरचा!
 
मी लवकरच पत्रकार परिषद घेईन. राष्ट्रवादीचा मोठा नेता अडचणीत येणार आहे. त्याची भारत आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, नेत्याच्या मैत्रिणीच्या नावे असलेल्या संपत्तीचा आणि भ्रष्टाचाराची पोलखोल तसेच त्या नेत्याच्या कुटूंबाच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीचीबद्दल महत्वाची माहिती देणारी पत्रकार परिषद लवकरच घेणार आहे, असे ट्विट मोहित कम्बोज यांनी केली आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0