सिद्धार्थ जाधवच्या पोस्टमुळे चाहत्यांची वाढली चिंता

16 Aug 2022 12:33:46
 
 
sid
 
 
 
 
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील एकदम उत्साही, सर्वांना हसवणारा आणि उर्जेने भरलेला असा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आत्तापर्यंत मराठी नाटक आणि चित्रपटातून तो आपल्याला भुरळ घालत होता परंतु आता तो थेट बॉलीवूडमध्येही पोहचला आहे. सिद्धार्थचे 'तमाशा' , 'दे धक्का २' या चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. शिवाय गेले अनेक दिवस सिद्धार्थ चर्चेत आहे. परंतु, त्याची धावपळ त्याच्या पथ्यावर पडलेली आहे. गेले काही दिवस तो प्रचंड आजारी होता. ही माहिती त्याने स्वतःहून आपल्या चाहत्यांना दिली आहे.
 
 
 
 
सिद्धार्थ मागचा एक आठवडा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता. १५ ऑगस्ट रोजी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आणि त्यानंतर सिद्धार्थनं स्वत: पोस्ट लिहून आपल्या प्रकृती विषयी चाहत्यांना कळवले आहे. गेले काही दिवस सतत धावपळ आणि दगदग होत असल्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. सिद्धार्थने रुग्णालयातील एक फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे.
 
 
 
View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

 
 
सिद्धार्थ म्हणतोय, 'नमस्कार... गेला आठवडाभर मी हिंदुजा हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होतो..आज घरी आलो... मनापासून आभार हिंदुजा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे..खूपच मनापासून काळजी घेतली माझी... अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टिम... एका फोन वर नेहमीच धावून येणारे अमेय खोपकर दादा ....शशांक नागवेकर दादा.. लव्ह यू ऑलवेज..सतीश राजवाडे दादा आणि स्टार प्रवाह परिवार तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता...आणि माझा मोठा भाऊ डॉ. लावेश जाधव ज्याने रात्रभर जागून माझी काळजी घेतली... मी बरं व्हाव्हं म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना मनापासून धन्यवाद... आता हळूहळू बरा होतोय... आपण खूप धावपळ करतो, पण त्यातही स्वतःच्या तब्येतीकडे कडे दुर्लक्ष होणार नाही याची आपणही कृपया काळजी घ्या...'
 
 
 
 
सिद्धार्थने त्याला नेमकं काय झालं होतं, हे लिहिलं नसलं तरी त्याच्या या पोस्टमुळे त्याने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.
Powered By Sangraha 9.0