माझा पक्ष वाढतोय! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दावा

16 Aug 2022 18:28:59
 
ramdas
 
 
 
मुंबई : भाजप मित्रपक्षांना संपवतो हा आरोप अत्यंत खोटा आहे, माझा पक्ष वाढतोय मला तसा अनुभव आला आहे अशी टिपण्णी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भाजप कधीच आपल्या मित्रपक्षांचा सन्मानच करतो हेच त्यांना यातून सुचवायचे आहे असे दिसते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट भाजप प्रणित रालोआचा घटक पक्ष आहे.
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहारचे विक्रमी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे अभिनंदन करताना भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवतो हे २०१९ मध्येच लक्षात आल्याने त्यांची साथ सोडली असा दावा केला होता. त्याच दाव्याला खोटे ठरवत रामदास आठवले यांनी भाजपच्या समर्थनार्थ टिपण्णी केली आहे. भाजपच्याच पाठिंब्यावर आठवले राज्यसभा खासदार झाले पुढे केंद्रात त्यांना राज्यमंत्रीपदही देण्यात आले. त्यामुळे भाजपवर केला जाणारा आरोप हा सपशेल खोटा आहे असेच आठवेले सुचवत आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0