दहशतवाद्यांकडून दोन काश्मिरी पंडितांची हत्या

16 Aug 2022 12:57:08
kashmir
 
 
नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीर मधील शोपीयान मध्ये दहशतवाद्यांकडून दोन काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली आहे. सुनीलकुमार आणि पिंटुकुमार अशी हत्या झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात या दोघा भावांचा मृत्यू झाला. या हत्यांमुळे काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढच होताना दिसत आहेत. मे महिन्यात झालेल्या राहूल भट या काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर तेथील वातावरण प्रक्षुब्ध झाले होते. यानंतर अजून एका काश्मिरी पंडित शिक्षिकेची हत्याही करण्यात आली होता. काश्मिरी पंडितांबरोबर काश्मिरी पोलिसही दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरत आहेत त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0