हर घर तिरंगा मोहिम : पेट्रोल पंपावर जमा करा तिरंगा! जाणून घ्या! काय आहे प्रक्रिया?

16 Aug 2022 15:14:39
National Flag Collection  
 
 
मुंबई : घरोघरी तिरंगा अभियानाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, तिरंग्याचे नंतर करायचे काय हा प्रश्न कुणालाही पडू नये म्हणून अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. देशात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दिवसात सर्वांनी घरी, दुकानात, कार्यालयात, जागोजागी तिरंगा लावला होता. तिरंग्याचा अवमान होऊ नये यासाठी इंडीयन ऑईलतर्फे राष्ट्रीय ध्वज संकलन मोहिम राबविली जाणार आहे.
 
 
स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरो घरी लावण्यात आलेल्या तिरंगा ध्वजाचा अवमान होऊ नये, त्यासाठी इंडीयन ऑईल तर्फे राष्ट्रीय ध्वज संकलन मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मार्फत आपल्याकडील ध्वज हा आपण इंडीयन ऑईलच्या पेट्रोल पंपावर जमा करु शकता. त्याचे चांगल्या पद्धतीने जतन इंडीयन ऑईलतर्फे केले जाईल, अशी हमी कंपनीने घेती आहे. तसेच या काळात पूर्नवापर करता न येण्याजोगा ध्वज नियमानुसार विसर्जित केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
 
 
आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि परिसर स्वच्छतेसाठी इंडीयन ऑईलने पुढाकार घेतला आहे. इंडीयन ऑईलच्या राष्ट्रीय ध्वज संकलन मोहिम ही १६ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट यादरम्यात इंडीयन ऑईलच्या पेट्रोल पंपावर राबवली जाणारआहे. तर या मोहिमेत आपणही सहभाग द्या आणि राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करुया.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0