शरीरप्रकृती आणि रोगप्रवण स्थिती

15 Aug 2022 22:27:00
disease
 
 
 
आपण कधी हे लक्षात घेतले आहे का, ज्यावेळी एखादी सारखीच,‘सिमिलर’ उत्तेजना लोकांना आजारी पाडण्यास कारणीभूत असते, त्यावेळी सर्व लोक हे वेगवेगळ्या प्रकारे आजारी पडतात व विभिन्न प्रकारे लक्षणे व चिन्हे दाखवतात. हे सर्व रोगप्रवणस्थितीमुळेच होत असते व त्यात रुग्णाच्या वैयक्तिक गुणधर्माचाही (इंडिव्हिज्युअलायझेशन) भाग असतो आणि गुणधर्म ठरत असतात. माणसाच्या जनुकीय ठेवणीवरून वातावरणातील बदल आजूबाजूच्या परिस्थिती तसेच आपल्या मतावरून, शिवाय आपल्या अनुभवांवरून आपले वैयक्तिक गुणधर्म ठरत असतात. म्हणूूनच प्रत्येक आजारी माणसाची लक्षणे ही वेगळी असतात.
 
 
Diathesis is the characteristic way of a person of getting sick.
 
वेगवेगळ्या ‘डायाथिसीस’चा अभ्यास करत असतात. एक फार महत्त्वपूर्ण ‘डायाथिसीस’ आज आपण बघणार आहोत व तोे म्हणजे, क्षयरोग प्रवृत्तकारक घटक. क्षयरोग प्रवृत्तकारक घटक हा मुख्यत्वे पूर्वी झालेल्या क्षयरोगाच्या संसर्गामुळे वाढीस लागतो. लहानपणी किंवा नंतर झालेल्या क्षयरोगामुळे शरीरात काही बदल हे कायमस्वरूपी होत असतात. हे बदल व लक्षणे क्षयरोेग बरा झाल्यानंतरही दिसून येतात, तसेच काही रूग्णांच्या तपासणीदरम्यान असे लक्षात येते की, या रुग्णांच्या (फॅमिली हिस्ट्री) कुटुंबातील आजारामध्ये क्षयरोग हा मुख्यत्वे करुन असतो व जरी या रुग्णाला क्षयरोग झालेला नसला, तरी जनुकीय ठेवणीनुसार या रुग्णामध्ये काही चिन्हे दिसत असतात, जी क्षयरोगसदृश्य असतात.
 
 
परंतु क्षयरोग नसतो. यालाच Tubercular Traits असे म्हणतात आणि हे  Traits'  मिळूनच ‘Tubercular Diathesis'’ बनत असतो. आता या रोगप्रवणस्थितीला ‘र्ढीलशीर्लीश्ररी ऊळरींहशीळी’ का म्हणतात? तर क्षयरोगाच्या सदृश्य अशी लक्षणे या लोकांमध्ये आढळतात व क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये जे बदल घडत असतात, तसेच बदल या रुग्णांमध्ये घडत असतात, पण त्यांना क्षयरोग नसतो. संपूर्ण तपासण्या जरी करून पाहिल्या, तरी क्षयरोगाचे निदान होत नाही. त्यासाठी ही लक्षणे काय असतात, ते आपण थोडक्यात पाहूया.
 
 
सतत येणारा खोकला.
 
तीन किंवा जास्त आठवडे सतत राहणारा खोकला.
 
खोकल्याबरोबर कफ व रक्त पडणे.
 
खोकताना तसेच श्वास घेताना छातीत दुखणे.
 
श्वसनावरोध.
 
काहीही कारणाशिवायही वजन कमी होणे.
अतिशय थकवा जाणवणे.
 
ताप येणे, संध्याकाळची कणकण जाणवणे.
 
रात्रीचा घाम येणे.
 
अचानक थंडी वाजणे.
 
भूक मंदावणे किंवा काहीही खाण्याची इच्छा न होणे.
 
इत्यादी लक्षणे जर रुग्णामध्ये आढळून आली, तर आपण त्याला क्षयरोगाच्या तपासणीसाठी पाठवतो.
 
यापुढे आपण अजून या ‘डायथिसीस’बद्दल माहिती पाहूया...
 
 
डॉ.मंदार पाटकर  
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0