मुंबई : अथक प्रयत्नानंतर आणि प्रमोशननंतरही आमीर खानचा चित्रपट लाल सिंह चड्ढा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप होताना दिसत आहे. तसेच अनेक कारणांमुळे तो वादात अडकला आहे. किंबहुना म्हणूनच या चित्रपटाला प्रेक्षकांची खूपच कमी संख्या दिसत आहे. हे सर्व सुरु असताना ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे ट्विट चर्चेत आले आहे. ज्यामध्ये त्यांनी तरुण मुलींवर प्रेमप्रसंग दाखविणाऱ्या बॉलीवूड स्टार्सवर ताशेरे ओढले आहेत.
विवेक अग्निहोत्री आपल्या ट्विटमध्ये लिहितायत, ‘चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल बोलणे तर सध्या विसरूनच जा, कारण जेव्हा ६० वर्षांचा नायक २०-३० वर्षांच्या तरुणींबरोबर रोमान्स करतोय आणि स्वतः तरुण दिसण्यासाठी फोटोशॉपचा वापर करतोय; यामुळे बॉलिवूडच्या मुळातच आता काहीतरी गडबड झालेली दिसून येत आहे.’
‘तरुण आणि कूल दिसण्याच्या सवयीने बॉलीवूडचा नाश केला आहे. या सगळ्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे’, असेही विवेक अग्निहोत्रीने ट्विटमध्ये लिहिले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी नाव घेता फक्त, '६० वर्षांचा अभिनेते २०-३० वर्षांच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करीत असल्याचा' वाक्यावरून लोक अंदाज लावत आहेत.
सध्या ५७ वर्षीय अक्षय कुमार ३३ वर्षाच्या भूमी पेडणेकरसोबत 'रक्षाबंधन' चित्रपटात काम करतोय. आणि दुसरीकडे ५३ वर्षांचा आमिर खानचा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे विवेक अग्निहोत्री नेमके आमिर खान किंवा अक्षय कुमार यांपैकी टार्गेट करतोय किंवा अन्य कोणाला टार्गेट करतोय का, हे सांगणे कठीण आहे. मात्र, कमेंट सेक्शनमध्ये बहुतांश लोक आमिर खानला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.