ब्रेकींग : राऊत वर्षभर तुरुंगात राहणार! सेना आमदाराला आधीच होती माहिती!

01 Aug 2022 13:12:44


viabhav
 
 
 
मुंबई : संजय राऊतांना अटक होणार आणि ते किमान वर्षभर तरी जेलमध्येच राहणार हे शिवसेनेतील वैभव नाईक यांना आधीच माहित होते असा दावा कुडाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. या ईडीच्या धाडीच्या आठ दिवस अगोदर संजय राऊत आपल्याला भेटले होते आणि आत वर्षभर आपण नसणार आपली शिवसेनेची विकासकामे, जनतेची सुरु असलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आता तुम्ही केले पाहिजे असेच राऊत मला म्हणले होते असे वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
 
 
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा कोकणातून सुरु झाला आहे . याच दौऱ्यात ते कुडाळमधील शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांच्या उठावात सामील झाल्याने जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरेंकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
 
 
केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात बोलत असल्याने त्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी संजय राऊतांवर ही कारवाई होत आहे असा आरोपही वैभव नाईकांनी केला आहे. संजय राऊत अजिबात न डगमगता या सर्व कारवायांसमोर ताठ उभे राहिले याबद्दल आम्हांला संजय राऊतांचा अभिमान आहे अशा शब्दांत वैभव नाईकांनी संजय राऊतांना पाठिंबा दिला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0