किरीट सोमय्या: नवाब मलिकांचे शेजारी होण्याचा बहुमान!

01 Aug 2022 16:32:41
 
raut
 
 
मुंबई: 'हम झुकेंगे नही' म्हणणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. रविवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ७ दरम्यान ईडीचे पथक संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी पोहोचले होते. तब्बल नऊ तासांच्या चौकशी नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ईडी कार्यालयात झालेल्या ८ तासांच्या चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली.
 
"माफिया कमिशनर संजय पांडे यांच्यानंतर आता माफिया नेता संजय राऊत यांना अटक झाली आहे. पत्राचाळ घोटाळा, वसई, नायगाव, अलिबागमधील जमिनी, मुंबईमधील सदनिका आणि परदेश वार्‍या या सगळ्यांचा जेव्हा हिशोब लागणार, तेव्हा नक्कीच आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिक यांचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊत यांना मिळेल." असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले.
 
- किरीट सोमय्या, माजी खासदार, भाजप नेते
Powered By Sangraha 9.0