संजय राऊत यांचे चुकलेच! पवारांची शपथ घ्यायला हवी होती

01 Aug 2022 18:21:31



shaarad

 
 

मुंबई : "संजय राऊत यांच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईच्या वेळी त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेण्यापेक्षा शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती" असा खोचक सल्ला देत शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत कारवाईला नाहीत असेही सांगायला कदम विसरले नाहीत. संजय राऊत या सगळ्यातून सहीसलामत सुटून बाहेर येतील असा विश्वास रामदास कदमांनी दाखवला आहे.

संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जवळीक जगजाहीर असून महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यासाठी या दोघांची मैत्रीच कारणीभूत होती. उद्धव ठाकरे देखील त्यांच्या सरकारच्या काळात संजय राऊत आणि शरद पावर यांच्याच तंत्राने अधिक चालत होते. ठाकरे सरकारच्या काळात संजय राऊत हे फक्त शिवसेनाच नव्हे तर महाविकास आघाडीचे स्वयंघोषित प्रवक्ते असल्यासारखे सतत माध्यमांशी बोलत असत.

संजय राऊत यांची हीच बडबड शिवसेनेतील उठावाला कारणीभूत ठरली होती. रामदास कदम यांचीही जेव्हा शिवसेनेतून हकालपट्टी झाली तेव्हा त्यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मात्र शिवसेनेतील अनेक नेत्यांचे अनेक घोटाळे बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीचे चक्र आले. यातून वाचवायला शरद पवार फिरकले सुद्धा नाहीत पण मग गेली दोन वर्षे त्यांच्या केलेल्या हुजरेगिरीचे हेच फळ राऊतांना मिळाले असेच कदम यांना सुचवायचे आहे.


Powered By Sangraha 9.0