जबलपूर येथील खाजगी हॉस्पिटलला आग!

01 Aug 2022 18:38:15
jabalpur
 
 
भोपाल: जबलपूर येथील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत. जबलपूरच्या गोहलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दमोह नाक्याजवळील न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारी आग लागली. रूग्णांना बाहेर काढण्यासाठी रुग्णालयात बचाव कार्य सुरू आहे असल्याचे जबलपूरचे जिल्हाधिकारी डॉ इलयाराजा टी यांनी सांगितले.
 
या आगीत चार जणांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तथापि, मृतांमध्ये रुग्णांचा समावेश आहे की नाही हे त्वरित स्पष्ट झाले नाही. जबलपूरच्या गोहलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दमोह नाक्याजवळील न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारी आग लागली, असे पोलीस अधीक्षक (एसपी) सिद्धार्थ बहुगुणा यांनी सांगितले. रुग्णालयात ठेवलेल्या जनरेटरमधून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा प्रशासन चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0