राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉल भारतीय महिला संघाने रचला इतिहास

01 Aug 2022 23:03:32
Commonwealth Games
 
 
बर्मिंगहम : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉल भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडला 16-13 असे पराभुत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात असणार आहे. हा सामना मंगळवार दि. 2 ऑगस्ट रोजी सांयकाळी 4 वाजता होणार आहे. याविजयामुळे संघाचे रौप्य पदक निश्चीत झाले आहे.
 
 
भारताच्या या संघात लवली चौबे, पिंकी, नयनमोकी सायरिका आणि रुपा राणी टिर्की यांचा समावेश आहे. शेवट पर्यत रंगलेल्या सामनात दोन्ही संघात चांगलीच टक्कर बघायला मिळाली. भारत सुरुवातीला 6-1 असा मागे होता, मात्र संघाने दमदार पुनरागमन करत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले. भारताने अंतिम दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर भारतील संघाला सुवर्ण पदक मिळेल.
 
 
 
 
 
भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत 3 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदके तर 1 कांस्य पदक पटकावले आहे. ही सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत. याचबरोबर 81 किलो स्पर्धेच्या चौथ्या दिवशी एकीकडे भारताच्या लॉन बॉल संघाने आनंदाची बातमी दिली, तर दुसरीकडे वेटलिफ्टर अजय सिंगची निराशा झाली आहे.
 
 
अजय सिंगने स्नॅच प्रकारामध्ये सर्वाधिक 143 किलो वजन उचलले होते. यामुळे तो तिसऱ्या स्थानावर राहिला. नंतर क्लिन एंड जर्कमध्ये पहिले 173 किलो वजन उचलले आणि दुसऱ्या प्रयत्नात 176 किलो वजन उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मात्र तिसऱ्या प्रयत्नात 180 किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. यामुळे अजय एकूण 319 किलो वजनासह चौथ्या स्थानावर राहिला. तर तिसऱ्या स्थानावरील खेळाडूने अजयपेक्षा एक किलो वजन अधिक उचलले होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0