बंगाल कॅश प्रकरण: झारखंड कॉंग्रेसच्या तीन आमदारांना अटक; दहा दिवसांची पोलीस कोठडी

01 Aug 2022 12:24:14
jharkhand
 
 
 
रांची: हावडा जिल्हा न्यायालयाकडून अटक करण्यात आलेल्या झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना दहा दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी शनिवारी आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्छप आणि नमन बिक्सल कोंगारी यांना हावडा येथून अटक केली. त्यांच्या 'एसयूव्ही' गाडीमध्ये मोठी रोकड सापडली होती. ही रोख रक्कम सुमारे ४८ ते ५० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
"आम्हाला मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे आम्ही कार थांबवली होती. झारखंडचे तीन आमदार कारमध्ये होते आणि आम्हाला आतमध्ये बरीच रोकड सापडली. रोख रकमेमुळे आम्हाला मोजणी यंत्र मागवावे लागले. संपूर्ण मोजणी झाल्यानंतरच किती रोख रक्कम जप्त करण्यात आली हे सांगता येईल,”  स्वाती भंगालिया (एसपी ग्रामीण, हावडा) यांनी सांगितले.
अटक झालेल्या आमदारांमध्ये अन्सारी हे जमताराचे आमदार आहेत, तर कश्यप हे रांची जिल्ह्यातील खिजरीचे आमदार आहेत आणि कोंगारी हे सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिराचे आमदार आहेत. त्यांच्या अटकेनंतर काही तासांतच काँग्रेसने स्वत:हून जबाबदारीपासून हाथ झटकले, आणि तीन आमदारांना निलंबित केले. झारखंड काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे प्रभारी अविनाश पांडे म्हणाले, "काल रोख रकमेसह अटक करण्यात आलेल्या तीन आमदारांना पक्षातून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे."
Powered By Sangraha 9.0