नांदेड : विठ्ठलभक्ताकडून १ कोटी किंमतीचा सोन्याचा मुकुट भेट!

09 Jul 2022 18:49:05

nanded
 
 
नांदेड : मागील २ वर्ष कोरोना संकटामुळे नियमावली पाळत मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी वारी पार पडली. मात्र यावर्षी विठ्ठल भक्तांना प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीच दर्शन घेता येणार आहे. अनेक भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. अशातच, नांदेडच्या एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा मुकुट भेट दिला आहे. अडीच किलो वजनाचे, १ कोटी किंमतीचे हे मुकुट आहे.
 
विजयकुमार उत्तरवार हे नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम पार पडेल.
 
 
Powered By Sangraha 9.0