मुंबई: मध्य रेल्वेच्या वाडीबंदर येथे बुधवार दि. ६ रोजी कंत्राटी मजुरांच्या मुलांसाठी "मेरी पाठशाला" शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे. मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनचं अध्यक्षा मीनू लाहोटी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ४० मुलांना वह्या, पेन आणि पेन्सिलचे वाटप करण्यात आले.
मिनू लाहोटी यांनी कंत्राटी मजुरांच्या शाळकरी मुलांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक चांगला अभ्यास करण्याचे समुपदेशन केले.या कार्यक्रमादरम्यान सर्व कोविड-१९ प्रोटोकॉल पाळण्यात आले. या कार्यक्रमात निती सिंग, उपाध्यक्षा, तनुजा पंकज, सरचिटणीस,दिव्या शर्मा कोषाध्यक्षा आणि मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन (सीआरडब्लूडब्लूओ) चे इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते. मध्य रेल्वे महिला कल्याण मध्यवर्ती संघटन (सीआरडब्लूडब्लूओ)ने जून २०२२ मध्ये गरजू महिला कंत्राटी कामगारांना पर्यावरणपूरक, सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप केले होते. महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी रेल्वे बोर्डाने "दस्तक" हा कार्यक्रम सुरू केला आहे.