कोल्हापूरकरांनो सावध राहा, पंचगंगा धोक्याच्या पातळीजवळ

06 Jul 2022 12:04:49

panchganga  
 
 
 
 
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेली पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीची पाणी पातळी ३० फुटांपर्यंत वाढल्याने नदीवरचे २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ३९ फूट ही धोक्याची पातळी समजली जाते , यामुळेच प्रशासन सतर्क झाले असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
कुठलाही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासन आधीच सतर्क झाले असून एनडीआरफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीच्या पुराने गेल्या वर्षीही हाहाकार उडवला होता. पंचगंगा नदी कोल्हापूर शहरातून वाहते त्यामुळे या पुराने शहरातील जनजीवन विस्कळीत होतेच त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यालाच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0