भारतीय वायूदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाप - लेकीची फायटर जेटमधून भरारी..

06 Jul 2022 17:13:42

jet
 
 
मुंबई: भारतीय वायूदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाप - लेकीने मिळून फायटर जेट उडवला आहे. याआधी वायूदलाच्या इतिहासात वडिलांनी आपल्या मुलीसोबत विमान उडवलेलं नाही. मुलगी अनन्या शर्मा भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर आहे. वडील एअर कमोडोर संजय शर्मा यांना १९८९ मध्ये फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आल. अनन्याची डिसेंबर २०२१ मध्ये फायटर पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
 
बाप - लेकीच्या या जोडीने वायुदलाचे हॉक - १३२ विमान उडवून इतिहास रचला आहे. अनन्यासाठी लहानपणापासूनच तिचे वडील प्रेरणास्थान होते. त्यामुळे मोठं झाल्यावर ती ही वडिलांप्रमाणे वायुदलात रुजू होण्याची स्वप्ने पाहू लागली. बीटेक पूर्ण केल्यानंतर भारतीय वायुदलात फ्लाईंग ब्रांचच्या ट्रेनिंगसाठी निवड झाली, आणि बाप - लेकीच्या ह्या जोडीने इतिहास रचला.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0