शिंदे - पवारांच्या भेटीचा 'खोटा' फोटो व्हायरल

06 Jul 2022 12:17:50

eknath shinde
 
 
मुंबई : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत भेटीचा खोटा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंबंधी शरद पवार आणि माझी अशी कोणतीही भेट झाली नाही. असे एकनाथ शिंदें यांनी ट्विटर पोस्टद्वारे स्पष्ट केले.
 
 
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये....." असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी व्हायरल वृत्त खोटे असल्याचा खुलासा केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली नाही. जुनाच फोटो कोणीतरी व्हायरल केला आहे. अशी माहिती पवारांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0